पुरस्कार व गौरव
सिंधुताईंना २७३ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांतले काही :-
- पुण्याच्या अभियांत्रिकी कॉलेजने दिलेला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुरस्कार (२०१२).
- २०१० - स्त्री व बाल कल्याण क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांसाठी असलेला महाराष्ट्र शासनाचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार.
- मूर्तिमंत आईसाठीचा २०१३ सालचा राष्ट्रीय पुरस्कार.
- आयटी प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा दत्तक माता पुरस्कार १९९६.
- सोलापूरचा डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार
- राजाई पुरस्कार.
- शिवलीला महिला गौरव पुरस्कार.
- श्रीरामपूर-अहमदगर जिल्हा येथील सुनीता कलानिकेतन न्यासातर्फे कै सुनीता त्र्यंबक कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा सामाजिक सहयोगी पुरस्कार १९९२.
- सीएनएन-आयबीएन आणि रिलायन्स फाउंडेशन दिलेला रिअल हीरो पुरस्कार (२०१२).
- २००८ - दैनिक लोकसत्ताचा सह्याद्रीची हिरकणी पुरस्कार.
- प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार (२०१५)